पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-W (४१ ) प्रकरण १० वें. साधुत्व आणि दैवी अद्भुत चमत्कार. चमत्कृति निधानही कृति तुझी जगाच्या पते 27 (कुसुमांजलि. ) १ संतांनी केलेल्या अद्भुत चमत्काराबद्दल आधुनिक विद्वानांत बराच मतभेद असल्याचे दृष्टोत्पत्तीस येतें. परंतु यौगिकशक्तींन असले चमत्कार संभवनीय असतात. हें पातंजलियोगदर्शना- वर लिहिलेल्या व्यासभाष्यावरून सहज लक्षांत येईल. साधूंच्या आँगीं दैवी चमत्कार करण्याचें सामर्थ्य असणें हें त्यांच्या साधु त्वाला एकप्रकारें भूषणास्पदच झटले पाहिजे. किंबहुना साधु आणि असाधु ह्यांच्यांतील भेद स्पष्टपणें कळून येण्यास “दैवी चमत्कार " हें एक प्रकारचें उत्तम साधनच होय. असो. आतां आह्मी पुढे श्रीमोरयांनी बालपणापासून केलेले काहीं चमत्कार यथाक्रम देतों. चमत्कार १ ला. एकेदिवशीं एका शेतकऱ्याने आपल्या खडकाळ जमिनी- जवळ श्रीमोरयांस नेऊन त्यांची भक्तिपुरःसर विनवणी केली की, महाराज आपल्या चरणधूलीनें माझी जमीन सुपीक व्हावी. तेव्हां श्रीमोरयांनी आपला चरणस्पर्श केला तेव्हापासून ती फार सुपीक झाली. ..