पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४० ) चिंतामणीनें त्यांचे पुढे दोन दीप प्रज्वलित करून ठेविले. पुढें गणेशपुराण मांडिलें. व आपल्या दोन्ही पत्न्यासह त्यांची पूजा करून साष्टांग नमस्कार केला. नंतर सर्व बाहेर आले. चिंतामणीनें सद्गदित अंतःकरणानें गुहेचें द्वार लावून घेतलें. व त्यावर शिळा टाकिली. व श्रीमोरयाचे डोक्यावरच नीट येईल अशी जागा शोधून तेथें सिद्धिबुद्धीसहित मंगल- मूर्तीची स्वहस्तें स्थापना केली. शके १५८० विलंबनाम सं० देऊळ बांधिलें; आरंभ कार्तिक शु || १२; संपूर्ण आषाढ शु॥ ४ श्रीमोरयांनी समाधी घेतल्याचें वृत्त लागलेंच चोहींकडे पस- रलें. भाविकजनसमुदाय दर्शनाकरितां येऊं लागला. समाधी- पुढें भजन, पूजन, नामसंकीर्तन सुरु झाले. ब्राह्मण भोजन झा- ल्यानंतर सर्वत्रांनी " मंगलमूर्ती मोरया" ह्या नौवाचा जय- घोष केला. नंतर सर्व समारंभ संपूर्ण होऊन भक्तजन आपापले घरी परतले. याप्रमाणे श्रीमोरया गोसावी यांनीं संसारांत राहून परमार्थसाधन कसें करितां येतें याचा प्रत्यक्ष अनुभवाचा धडा जगाच्या निदर्शनास आणून दाखविला. हे त्यांचें जगावर केवढे उपकार झाले ! ! ! श्रीमंगलमूर्ति मोरया.