पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३९ ) लोकांकडून पुष्कळ उपसर्ग लागूं लागला. ह्मणून ते फार कंटा- ळले नंतर त्यांनी श्रीमंगलमूर्तीची दर्शन देण्याविषयीं भक्ति- पुरस्सर प्रार्थना केली. श्रीमंगलमूर्तींनी तत्काळ प्रगट होऊन श्रीमोरयांस दर्शन दिलें व तुझी काय इच्छा आहे ती निवेदन कर ह्मणून विचारिलें. श्रीमोरयांनी या पुढे आपणांस गुप्तवास असावा व जगांत तुझें आस्तित्व असेपर्यंत मला तुझ्या चरणा- चें दास्य द्यावें असें मागणें मागितलें. श्रीनीं तें मान्य करून मी तुझे हृदयमंदिरी अक्षय्यवास केला आहे. व तुझे इच्छेप्र- माणें सर्व गोष्टी यथास्थित होतील असा वर दिला आणि आ पण अंतर्धान पावले. ३ श्रीमोरयांनी तीच आज्ञा प्रमाण मानून आपल्या पुत्रास चिंतामणीस समाधी घेण्याचा आपला मनोदय कळविला व लागलीच पवना नदीचे कांठीं शुद्ध भूमी पाहून एक गुहा तयार करण्यास आज्ञा केली. चिंतामणीनें आज्ञेप्रमा- णें गुहा तयार करून ठेविली. शके १४८३ मार्गशीर्ष वद्य ६ रोजी प्रातःकाळी पवनानदीवर त्यांनीं स्नान संध्या आटोपून श्रीमंगलमूर्तीचें यथासांग पूजन केलें. नंतर ते गुहेंत उतरले, आसन विधि केला, नासाग्री दृष्टि ठेवून समाधी लाविली,