पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३८ ) भुलून जातो. परंतु अंतःसृष्टीचा ज्ञानदीप त्याच्या नजरेपुढे येत नाहीं. ह्याचें कारण उघड आहे कीं, मनुष्यप्राणि हा जात्या उत्सवप्रिय असल्याने त्याचा ओढा जन्मास येऊन जगांतील अनंत सुखें भोगावीं ह्याकडेसच विशेष असतो. परंतु सारभूत जें तत्व त्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे "पुनरपि जननं पुनरपि मरणं " ह्यामकारें श्रीमच्छंकराचार्यांनी वर्णिल्याप्रमाणे त्याची स्थिति होते. ही स्थिति घालविण्याचा एकच उत्तम उपाय ह्मटला ह्मणजे संसारांत अलिप्त राहून पर- मेश्वराचें नामसंकीर्तन व भजनपूजन ह्याची संवय मनास ला वून घेणें हा होय. पूर्वोक्त तत्वानुरोधानें श्रीमोरया गोसावी आ- पला वर्तन क्रम चालवीत असतां त्यांस गुरुदर्शनाची अत्यंत उत्कंठा प्राप्त झाली. व पूर्वदृष्ट गुरूंची भेट कशी होईल अशी त्यांस मोठी चिंता पडली. हें गुरुमहाराजांनीं योगबळानें जा- जून त्यांस पूर्वी सांगितल्याप्रमाणें आकस्मिक येऊन भेट दिली. श्रीमोरयांनी गुरुपदास अत्यादरपूर्वक वंदन करून मे मात्र ढाळले. व यापुढे आपण येथेंच वास करावा अशी इच्छा- दर्शविली. ती त्यांनी मान्य करून आपलें अवशिष्ट आयुष्य त्यांचेजवळच घालविलें. नंतर थोडक्याच कालांत ते समाधिस्त झाले. (शके १४८१ ) २ श्रीमोरया गोसावी यांचा महिमा फार वाढल्यामुळे त्यांस