पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३७) केला तो अद्यापही आहे. यावेळी श्रीचा तांदळा बरोबर नेण्याची चहिवाट आहे. ३ श्रीमोरयांनी गृहस्थाश्रमाचा या रीतीनें अनुपम सुख लाभ घेऊन ऐहिक कर्तव्याची मर्यादा संकुचितकेली. आणि पुढे आपला काळ त्यांनी केवळ ईश्वरभजनांत आणि ब्रह्मानंदांत घालविला. खरोखर अशा सत्पुरुषाच्या सदुप- देशानें आणि त्यांच्या चरित्रमननानें मनुष्य प्राण्याचें कल्याण- च होईल यांत संशय नाहीं सत्पुरुषमालिकेंत अशारीतीनें गृहस्थाश्रमाचा लाभ संपादन लाभ संपादन झालेला अन्यत्र क्वचितच दृष्टीस पडेल असो. या नंतर त्यांनी आपला काल जगापासून अलिप्त राहण्याकडे कसा लावला याचें वर्णन पुढील भागांत येईल प्रकरण ९ वें. ९ समाधियोग. " असो ऐसे सकळही गेले । परंतु एकचि राहिले ॥ जे स्वरूपाकार झाले । आत्मज्ञानी ॥ ५९ ॥ ( श्री रामदास ) १ या जगांत जननमरण विरहित स्थिति प्राप्त करून घेणें हेंच संसाराचें मुख्य सार आहे. मनुष्य प्राणी बाह्य सृष्टीला पाहून