पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३६) थाटामाटानें श्रींच्या देवालयांत आणून ठेविलें. व त्याची मोरेश्वरासह पूजा केली. नंतर त्यांनी पाषाणही द्रवून जाईल. इतक्या कळवळ्यानें देवास आळविलें. त्यावेळी देवा- च्यागळ्यांतील पुष्पमाळा मोरयांच्या कंठांत एकदम येऊन पडली तोच शेवटचा महाप्रसाद जाणून श्रीमोरया तांदळ्यासह देवालया बाहेर चिंचवडास जाण्याच्या उद्देशाने निघाले त्यांच्या मागें प्रभुही निघाले सातपावलें पुढे चालून गेले नाहींत तोंच त्यांनी देव खरोखरच आपलेबरोबर येत आहे काय ह्मणून मागें वळून पाहिलें. तेव्हां श्रीमंगळमूर्ती ह्मणाले तूं जर भागें पाहिले नसतेंस तर मी "यावच्चद्रंदिवाकरौं” तुझे वंशांत अखंड अवतीर्ण झालो असतों. आतां सातपिढ्यांपर्यंत माझासाक्षात्कार तुझे वंशजांस होईल. गोरयानीं भवितव्य जाणून समाधान मानिलें व पुढें चालले. त्यांचेबरोबर त्यावेळचे चिमणजोसी, अप्पाभट जुन्नरकर, गुरनेरकर, अमळनेरकर, देशपांडे वगैरे ठोकळ मंडळी आली. चिंचवडानजीक येतांच चिंचवडकरांनी मोठ्याच थाटा- माटानें श्रीमारेयांस सामोरे जाऊन गांवांत मिरवीत आणिलें. व यथाशक्ति समारंभ केला. २ प्रसादमूर्ती चिंचवडास आणिल्यावर श्रीमोरयांनी तिची स्थापना केली व आपण तिच्या भजनपूजनांत दंग झाले. यानंतर ते मोरगांवीं वारीस गेले नाहीत. फक्त भाद्रपदमासी व माघमासी यात्रेस जाण्याचा प्रघात श्रीच्या आज्ञेप्रमाणें सुरू