पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३५ ) झाला नदीचे पलीकडे शमीवृक्षावर देव मोरेश्वराच्या नामाचा गजर करीत होते. जवळच पुष्पें, शमी, दूर्वा, नैवेद्याचें सामान असें साहित्य पडले होतें. हा चमत्कार श्रीमोरयांनी पाहून नदीवर जमलेल्या ग्रामस्थांसही तो दाखविला. उदईक श्रीमोर- यास प्रसाद प्राप्त होणार हें वृत्त आगाऊच सर्वत्र पसरलें अस- ल्यानें पुष्कळ लोकांचा समुदाय तेथें जमला होता अकबर बादशाच्या बापाचा सरदार अल्लाउद्दीन हाही हें वृत्त ऐकून सुप्पाहून मोरगांवास आला; श्रीमंगलमूर्तीच्या दर्शनाकरितां देव प्राप्त झाले आहेत, हें जाणून मोरयागोसावी त्यांचे संनिध गेले. व मिळविलेल्या सर्वशाखांची एकत्र भाजी व कणकेची पोळी करून त्यांनी शमीखाली देवास भोजन समर्पण केलें. व अवशिष्ट नैवेद्य सर्वलोकांस वाटिला उच्छिष्ट रजःकण पडले होते ते देवतांनी पक्ष्यांच्या रूपाने येऊन भक्षण केले. हें पाहून श्रीमोरया ह्मणाले माझ्या वंशजांनी याच ठिकाणी जीव- मात्रास अन्नसंतर्पण करावें. व ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत प्रसाद द्यावा ह्या ठिकाणास हल्ली पोळी असें ह्मणतात व सर्व- शाखांचा प्रसाद जो तेव्हांपासून चालू झाला तो अद्यापही चालू आहे. येथे अंत्यजांनीं उच्छिष्टास जरी स्पर्श केला तरी दोष धरीत नाहीत अशी वहिवाट अद्यापही आहे. श्रीमोरयांनी नदीवरून त्या मंगलमूर्तीरूप तांदळ्यास मोठ्या भक्तीनें व