पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२) ७ 56 हा प्रयत्न पहिलाच असल्यामुळे त्यांत कित्येक दोष आढळण्याचा संभव आहे, करितां तिकडे दुर्लक्ष करून ग्राह्य भाग असेल तो हंसक्षीर न्यायानें " घेण्याची वाचकांस सविनय प्रार्थना आहे. सदर पुस्तक लिहितांना ज्यांनी ज्यांनी आपला अमूल्य वेळ ख- चून मला साधार माहिती दिली त्या चिंचवडकर सङ्गृहस्थांचा मी फार आभारी आहे. तसेच पुस्तकाच्या अंतर्यवस्थेत ज्या माझ्या सुहृदांनी (ज्याचा नाम निर्देश करण्याची मला परवानगी नाहीं) अत्यंत मदत केली त्यांचा तर मी अत्यंत ॠणी आहे. नकाशे काढण्याचें बरेचसे श्रेय येथील एक सुखवस्तु गृहस्थांकडे आहे. सर्व पुस्तक लिहून तयार झाल्यावर द्रव्याभावामुळे ते बरेच दिवस छापण्याचे राहिले गेले होते. पुस्तक कसे छापून प्रसिद्ध होईल या विवंचनेंत पडलो असतां मला श्रीमंगलमूर्तीनी एकाएकी प्रेरणा केल्यावरून मुंबईस गेलो. प्रयत्नांती श्रीमंत ग० स० राव हायकोर्ट वकील; श्री. डाक्टर सर भालचंद्र कृष्ण; श्री. नारायण माधवराव समर्थ हायकोर्ट वकील; श्री. तुकाराम जावजी शेट जे. पी० इ० ग णेशभक्तांनी उदार अंतःकरणांनी द्रव्यद्वारा। यथाशक्ति मदत के ल्यामुळे बरीच उमेद आली शेवटी माझे ग्रामस्थबंधु आणि मुं- बईचे फार जुने प्रसिद्ध बुक्सेलर व पब्लिशर रा. बा० ल. पाठक यांचे दुकनाच धार्मिक व भाविक मालक श्री पंढरीनाथ विनायक पाठक यांनी पुस्तक छापून प्रसिद्ध करण्याची माझी विनंती मान्य केल्यावरून आज हा सुयोग प्राप्त झाला आहे. याबद्दल मी या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. फार तर काय पुस्तकप्रसिद्धीचे सर्व श्रेयच त्यांजकडे आहे अखेरसि ज्या श्रीमंगलमूर्तीच्या कृपा- प्रसादानें हा सुमंगल दिन प्राप्त झाला, त्याचे चरणीं शतशः प्रणाम करून ही प्रस्तावना संपवितो. २ कर्ता.