पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३४ ) प्राप्त झालेला श्रीमोरेश्वरांचा कृपाप्रसाद हेच होय. असो. मागीलभागांत सांगितल्याप्रमाणें श्रीमोरयांचा क्रम सुरु असतांच एकेदिवशीं चतुर्थीस ते मोरगांवीं वारीस गेले. (वाटेनें जातांना व तेथें गेल्यावर जे चमत्कार झाले ते चमत्कार प्रक- रणांत नमूद केले आहेत. ) श्रीमोरेश्वराचें मनःपूर्वक ध्यान क रीत असतां श्रींची ऋद्धिबुद्धिसहीत तेजोमय स्वारी मोरयांच्या पुढें एकदम येऊन अवतीर्ण झाली. श्रीमोरयांनीं नेत्र उघडून त्यांचें दर्शन घेतांच सर्वांगी आपादकंचुकित रोमांच उभे राहिले, व डोळ्यांतून आनंदाश्रूंचा पूर लोटला श्रीमंगलमूर्तींनी आपल्या प्रिय भक्तास उठवून सांगितलें कीं "तुझी वारी आतां मला पावली यापुढें तूं माझ्या वारीस येऊं नकोस. तुझा वृद्धा- पकाल झाल्यानें तुझे फार हाल होतात ते माझ्यानें बघवत नाहीत आतां मीच तुझे घरीं येऊन राहतों, उदईक सकाळी गणेशकुंडांत स्नान करीत असतां तुला जो प्रसाद प्राप्त होईल तो माझेस्वरूपाचाच आहे त्यास घेऊन मागें न पाहतां तूं चिंचवडास जा " असें ह्मणून श्रींची स्वारी अंतर्धान पावली. शके १४१४ सालीं श्रीमोरयागोसावी एकेदिवशी सकाळीं नित्याप्रमाणे कन्हानदीवर गणेशकुंडांत स्नानास उत- रले. व बुडीमारून वर येतात तोंच त्यांच्या ओंजळीत श्री मंगलमूर्तीचा तांदळा आला त्यावेळी आकाशांतून पुष्पवर्षाव