पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३ ) त्याचा विवाह केला त्याला दोन कांता होत्या त्याही महान् पतिव्रता सुशील अशा मिळाल्या होत्या. श्रीमोरयांना असा पुत्र लाधलेला पाहून फार धन्यता वाटे त्यांनी आपले सर्व लक्ष ईश्वरचरणी लावून आपला नित्य नेमधर्म मोरगांवची- वारी करणें वगैरे सर्वक्रम यथास्थित व नेटानें चालविला होता. वारीस जात असतां मोरयांनी जे कित्येक दैवी चम त्कार करून जगाच्या अनुभवास आणिले ते पुढें एक- समुच्चयेंकरून कथन केले आहेत. प्रकरण आठवें. ● प्रसादप्राप्ति. " प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते " ( श्रीमद्भगवद्गीता ) १ या जगांत ईश्वरी प्रसाद ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. आणि ती मिळाल्यावांचून कोणत्याही कामांत यश येणें फारच दुर्घट आहे ईश्वरीप्रसादानें असाध्य तें साध्य व असंभ- वनीय तें संभवनीय होतें, मनुष्यकृत प्रयत्नाला फळसिद्धि प्राप्त होणें हें सर्वस्वी ईश्वरी प्रसादावर अवलंबून आहे. श्रीमो रयांच्या तपाला जें येवढे यश मिळाले त्याचें कारण त्यांना ३ +