पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३२) करून चिंचवडास आले तोंच त्यांस उमाबाई प्रसूत होऊन मुलगा झाल्याचें आनंदकारक वृत्त समजलें. मग पुत्र- मुखावलोकन करण्याचे हेतूनें श्रीमोरया सूतिकागृहांत गेले. व पाहतात तो पूर्वी सांगितलेल्या सर्व खुणा व आपण थेऊर येथे केलेली महापूजा मुलाच्या आंगावर उमटलेली दिसली. मग श्रीमोरयांच्या त्या वेळेच्या आनंदास काय पारावार आहे ? त्यांनी माझ्या आभाग्यांच्या घरी प्रत्यक्ष पुत्ररूप कामधेनूच प्राप्त झाली असे मानून त्यांस परम समाधान वाटलें. बारावे दिवशीं जातकरण नामकरण विधि होऊन मुलाचें नांव " चिंतामणि" हेच ठेविलें. ४ चिंतामणि शुक्केंदुप्रमाणें जस जसा वाढत गेला तस तसा तो आपल्या मातापितरांस व इतर जनांस ही अत्यंत सुखावह वाटू लागला. त्याची वृत्ती बाळपणापासूनच आपल्या वडिलां प्रमाणें ईश्वरचरणाकडे वळलेली होती. व तदनुरूप त्याच्या बाळपणच्या सर्व क्रीडा ही होत्या. त्याच्या वयाच्या सातव्या वर्षी श्रीमोरया गोसाव्यांनी त्याचा व्रतबंध संस्कार यथाविधि केला. आणि मुलाचा पूर्ण अधिकार पाहून त्यांनी त्याचे मस्तकीं वरदहस्त ठेवून त्यास अनुग्रहपूर्वक शिक्षण दिलें. चिंतामणि पुत्र धर्मास अनुरूप अशीच आपल्या मातापि- त्यांची सेवाचाकरी करीत असे. श्रीमोरयांनीं यथाकाली