पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३१) भोजन करावें. भोजनोत्तर सद्ग्रंथ श्रवण व पठण करावे. रात्रौ पूजा अर्चा धूपात करून श्रीमंगलमूर्तीचें एकाग्रमनानें भजन करावें. ह्या प्रमाणें ह्या सत्पुरुषाचा वर्तनक्रम असे. श्रीमोरयांच्या प्रपंचाला भार्या ही फार उत्तम मिळाली. वय लहान असूनही तिनें सर्व प्रपंच उत्तम आवरला. ती सत्कुलोत्पन्न असून मोठी दयाशील, शांतस्वभावाची, व सर्व प्रकारें अनुकूल अशी होती. परोपकार करण्यांत व आबालवृद्धांसी प्रेमानें वागण्यांत ती मोरयांच्या पेक्षां. कांकण भर जास्तच असे. मी व माझा संसार असा भाव त्यांचे मनास कर्धी शिवला नाहीं. सर्व संसार श्रीमंगलमूर्तीचा तेव्हां त्याचा तोच चालवून घेतो अशा निरहंकारपणानें उभयतां वागत असत. ३ कांहीं काळ लोटल्यावर श्रीमोरयांची पत्नी उमाबाई ही गर्भवती झाली. नवमास पूर्ण होतांच शके १४०३ विकृती नाम संवत्सरे मिति माघ वद्य ४ रोजी चंद्रदर्शनीं ती पुत्र- रत्न प्रसवली. या वेळेस श्रीमरिया हे स्थावरक्षेत्रीं श्रींच्या वारीस गेलेले होते. तेथें चिंतामणीची पूजा कररीत देवालयांत बसले असतां गुंगीत दृष्टांत झाला की मी चिंच- वड येथें तुझे घरी जन्मास आलों आहें. तूं जाऊन- पाहा. नंतर श्रीमोरयागोसावी अत्यानंदानें तातडी