पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३० ) गोसाव्यांच्या बाजूनें श्री मंगलमूर्ती व ऋद्धिसिद्धि यांनी सप- रिवार येऊन साजिरा केला सर्व धार्मिक विधि व सर्व लौकिक विधि. यथास्थित झाले. मुलीचें नांव उमा ( सरस्वती ) असें ठेविलें. या लग्र समारंभास पंचक्रोशीतील निमंत्रित अनि- मंत्रित मंडळींचा समुदाय पुष्कळच जमला होता. त्यांचा यथोचित आदरसत्कार व भोजनविधि हे सुव्यवस्थित झाले. गोविंदरावास तपस्वी जामात मिळाला ह्मणून लोक त्याचे धान्यवाद गाऊं लागले. चार दिवस यथासांग लग्नसोहळा उरकल्यावर श्वशुर जामातांच्या प्रेमभेटी झाल्या नंतर गोवि- दराव आणि इतर जन समुदाय आनंदानें आपापल्या घरी परत गेला. आणि श्रीमोरयागोसावी आपल्या पत्नीसह आनंदानें कालक्रमणा करूं लागले.- - यावेळी केलेला चमत्कार पुढें वर्णिला आहे... P २ गृहस्थाश्रमाचा स्वीकार केल्यापासून श्रीमोरयांचा नि- त्यक्रम असा असेः— त्यांनी ब्राह्ममुहूर्ती उठून प्रातः स्मरण व सद्गुरुचिंतन करावें. नंतर शौचमुखमार्जनादि विधि उरकून सूर्योदयापूर्वी पवनेवर स्नानास जावें, तेथें संध्या ब्रह्मयज्ञादि विधि सारून मग घरी येऊन पूजा अर्चा करावी नंतर ध्यान. धारणादि विधि उरकावा अतीत अभ्यागत आल्यास त्यांचा . यथायोग्य आदर सत्कार करून महानैवेद्य कसवा व त्यासह