पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २९ ) णार. त्यांतूनही आमचे वयास सुमारें शहाण्णव वर्षे झाली आ- हेत. आमची गृहस्थिति अत्यंत गरिबीची आहे. तेव्हां अशा दुःस्थितींत तूं आपली मुलगी लोटावीस असें मला वाटत नाहीं. इतक्यावर तुझी मर्जी. अर्से भाषण ऐकून गोविंदराव ह्मणाला महाराज आपल्यासारखा तपोनिष्ठ जामात मला कोठें मिळावयाचा आहे ? मला आपल्या संपत्तीची बिलकूल अपेक्षा नाहीं ज्याला प्रत्यक्ष श्रीमंगलमूर्ती व ऋडिसिद्धि प्रसन्न होऊन अनुकूल झाल्या आहेत त्यांना कोणत्यागोष्टी- ची वाण पडणार ? तुझी माझ्या विनंतीस मान दिलाच पाहि- जे. हैं त्यांचें भक्तिपुरस्सर भाषण श्रीमोरयांनी श्रवण करून व श्रीचिंतामणींची पूर्वदत्त आज्ञा ध्यानांत आणून ते त्यांच्या झणण्या प्रमाणें विवाह करण्यास सिद्ध झाले. नंतर गोविंद. राव मोठ्या प्रसन्न अंतःकरणानें आपले घरीं गेले. आणि घडलेला सर्व वृत्तांत स्यांनी आपल्या पत्नीस कळवि- ला- हा जुळून आलेला योग तिला फारच पसंत पडला. आणि त्या उभयतांनीं यथाशक्ति सालंकृत कन्यादान करू- न देण्याचा निश्चय ठरविला गोविंदरावानें चिंचवड येथें येऊ- न ग्रामस्थांच्या मदतीनें शुभ मुहूर्तावर लग्नसमारंभ पार पाड- ला ज्या विवाहास प्रत्यक्ष विघ्नहराची अनुकूलता त्याला कोठें कमीपणा यावयाचा आहे ? सर्व समारंभ श्रीमोरया .