पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २८ ) मनोभावें पूजा केली व स्तवन करून मोठ्या सद्गदीत अंतःक- रणानें श्रींचा निरोप घेऊन मोरगांव सोडिलें व फिरत फिर- त लवकरच मधम चिंचवडानजीक ताथवडे गांवीं एकांत- स्थान पाहून राहिले. (त्यांनी तेथें केलेले चमत्कार पुढें वर्णिले आहेत ) तथापि तेथेंही त्यांस जनतेचा उपसर्ग फार लागू लागला. शेवटी त्यांनी कंटाळून पवित्र पवनातटा - की चिंचवड येथें रमणीय स्थल पाहून आपला कायमचा वास केला नंतर तेथून त्यांनी जवळच असलेल्या श्रीकिवजाई देवी- च्या जंगलांत जाऊन तपश्चर्या करावी. असा त्यांचा नित्य- क्रम चालला असता एके दिवशीं श्रीचिंतामणीच्या दृष्टांतानें प्रेरित होऊन राईत पुनवळें येथील काश्यप गोत्री गोविंदराव कुलकर्णी या नावाचा एक ब्राह्मण चिंचवड येथें श्रीमोरया गोसावी यांजकडे प्राप्त झाला. व त्यांस ह्मणाला की महाराज माझी उपवर मुलगी आपणास अर्पण करावी अशी श्रीचिंतामणीची मला आज्ञा झाल्यावरून मी आपणाकडे आलों आहें व मा- झीही इच्छा तशीच आहे. करितां आपण तिचें पाणिग्रह- ण करावें' अशी विनंति केली. त्यावर श्रीमोरयांनी उत्तर दिलें कीं, आह्मां वैराग्यशील माणसांना मुलगी देऊन काय उपयोग आहे ? जरी ईश्वरसिंकेतानें आम तुझ्या मुलीचा अंगीकार केला तथापि आमची नैराश्यता ही कायमच राह- C