पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२७) श्रेष्ठ आहे, किंबहुना इतर तिन्ही आश्रम गृहस्था श्रमावरच अवलंबून आहेत. याच आश्रमांत कामक्रोधादिक शत्रु जिंक- ण्याचे वारंवार प्रसंग येतात. तसे इतरत्र येत नाहींत. गृहस्था- श्रमांतच जर शमदमादि देवता षडरिपूंचा नायनाट करितील तर ती गोष्ट विशेषच प्रशंसनीय होय. यथाशक्ति आर्तदुःख विमोचन अज्ञजनास सन्मार्गदर्शन यांतच खरा पुरुषार्थ आहे. " नाहीं परोपकारापरि दुसरें थोर पुण्य हें वचन हें परोपकारासारखें खरोखर दुसरे मोठें पुण्य या जगांत लाधत नाहीं. तेव्हां अशा ह्या गृहस्थाश्रमांतच ह्या वरील गोष्टींचा अनुभव घ्यावयास सांपडतो. असे असूनहि श्रीमोरयांनी केवळ परमार्थिक बुद्धीनें त्याचा अव्हेरच केला होता परंतु केवळ परमेश्वरी अनुज्ञा ह्मणूनच तो त्यांना पुढें पतकरणें भाग पडलें. " 9 २ श्रीमोरयांची वृद्ध मातापितरें निवर्तल्यावर त्यांस एकांत वास करावा अशी इच्छा झाली ह्मणून त्यांनी राउळांत जाऊ- न श्रीमोरेश्वराची आज्ञा मागितली; त्यावरून श्रींनीं दृष्टांत दिलाकीं तूं "आतां पवनातीरी चिंचवडास जाऊन वास्तव्य- कर मी नित्य तुझे जवळच आहे मात्र प्रतिमासी चतुर्थींस ए- कवेळ माझे वारीस चिंचवडाहून येथें-मोरगांवास येत जा व तुला थेऊर येथे झालेल्या दृष्टांताची स्मृति ठेवून वर्तन कर" श्रीमोरयांनी ही प्रभुची आज्ञा शिरसावंद्य करून श्रींची .