पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २६ ) तूं सूज्ञच आहेस" असें ह्मणून श्रीमोरेश्वराचें नामस्मरण करीत करीत देहविसर्जन केला. व इहलोकची आपली यात्रा संपविली. शके १३३२. त्यावेळी त्यांचें वय सुमारे १३० वर्षांचें होतें असें एका हस्तलिखित पत्रावरून समजतें. जुन्या बखरीतून त्यांचें वय सुमारें १२५ वर्षांचें असावें असें आढळतें. असो. ३ मातापितरांचें वियोगजन्य दुःख श्रीमोरयास कांहीं काळपर्यंत वाटलें. तथापि त्यांच्या दैवीसंपत्तीमुळे त्यांजवर प्रापंचिक लोकांप्रमाणें दुःखाचा पगडा बसला नाहीं. जनरु- ढीप्रमाणे वडिलांचें और्ध्वदेहिक कृत्य दानधर्म वगैरे यथासांग करून श्रीमोरयांनी आपला पूर्वक्रम सुरूं केला. श्रीमोरयांनीं गोमदान वगैरे केल्याचें दर्शक चित्र मोरगांवीं गणेशकुंडा- समीप देवळाच्या दगडावर खोदलेले आढळतें. प्रकरण सातवें. ७ गृहस्थाश्रम. " सतुंष्टो भार्यया भर्ता भर्ना भार्या तथैवच | यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ॥ १ आश्रम चतुष्टयांपैकी कोत्याही आश्रमांत ण्यास प्रतिबंध नाहीं, तथापि गृहस्थाश्रमाचा ( मनुस्मृति ) जीवन्मुक्त हो - महिमा फार