पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५ ) ह्या उक्तीप्रमाणें तोच नर जन्मास आला की ज्यानें आपला वंश उन्नतीच्या शिखरास नेऊन पोंचविला नाहीं तर चक्रा सारख्या फिरणाच्या या संसारांत कोण जन्मास येत नाहीं ? व कोण बरें मरत नाहीं ? या गोष्टीची यथार्थता सिद्ध करण्यास खरोखर श्रीमोरयांचे वडील वामन भटजी हे कसे कारणीभूत झाले हैं चतुर वाचकांच्या सहजी लक्षांत येणार आहे. २वामन भटजीनी सर्व तीर्थयात्रावगैरे यथासांग केल्या आणि राउव्यंत जाऊन श्रीमंगलमूर्तीचरणीं विनंति करून शेवटचा निरोप मागितला कीं, हे प्रभो ! हा माझा देह आतां येथेंच तुझ्या चरणीं पडावा. सती पार्वती बाईनेंही आपल्या पतीनीं श्रीचरणीं केलेली विनंति ऐकून सतीधर्माप्रमाणें वामनभटजींचीं आज्ञा घेऊन श्रीचरणीं देह आधीच अर्पण केला. पत्नीच्या निधनानंतर वामन भटजीस आपला काळ लौकर व्हावा असें वाटू लागले व ते पूर्वीपेक्षां अधिकच वैराग्यशील बनले. त्यांचें सर्व तन मन धन श्रीमोरेश्वर चरणीं लागून राहिलें. पुढे सुमारें चार महिन्यांनी वामन भटजी नित्याप्रमाणें देवळांतून श्रीची पूजा अर्चा करून आले व कऱ्हेच्या तीरी जाऊन गणेश ती- थीजवळ बसले. आणि श्रीमोरयास प्रेमपूर्वक जवळ घेऊन अत्यंत कळकळीनें उपदेश केला कीं, तूं पूर्णब्रह्म मोरेश्वर चर- णीं सदोदित तत्पर रहा येवढेंच आर्ता तुला माझें सांगणें आहे.