पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. संसारत्याग न करितां । प्रपंचउपाधी न सांडतां ॥ जनामधें सार्थकता | विचारेंचि होय ॥ ( श्री रामदास ) १ह्या असार संसारांत मनुष्य प्राण्याला सुखशांति प्राप्त होण्याची जीं अनेक साधनें आहेत त्यांतच संतचरित्रांचे वाचन आणि मनन हैं एक मोठे सुलभ साधन आहे. प्रस्तुत चरित्राचे नायक श्रीमोरया हे एक अद्वितीय पुरुष होऊन गेले. त्यांच्या साधुत्वाची कीर्ति महराष्ट्रांत सर्वत्र पसरलेली आहे. त्यांचा चरित्र भाग लिहिण्याचा सुयोग आज प्राप्त झाला ही केवळ त्यांचीच कृपा होय. उद्योगधंद्या निमित्ताने माझे चिंचवड गांवीं येणें झाले आणि येथें आल्यावर त्यांच्या दर्शनलाभाने एक प्रकारची मनास स्फूर्ति उत्पन्न झाली. त्या स्फूर्तीनेंच श्रींचा चरित्रभाग लिहिण्याचा मी उपक्रम केला. तो कितपत सिद्धीस गेला हैं ठरविणे सदय वाचकांच्या धर्म- बुद्धीवरच अवलंबून आहे. २ श्रीतुकाराम महाराज किंवा श्रीरामदास यांच्या इतका जरी लौ- किक पसारा त्यांचा दिसून येत नाहीं तरी साधु या दृष्टीने त्यांच्या पेक्षां ते कमी होते असे नाहीं. वरील साधुद्वयाप्रमाणे श्रीमोरयांनीं ग्रंथरचना वगैरे फारशी केलेली दिसत नाहीं, किंवा आपण स्वी कारलेल्या दक्षेिचा लोकांत प्रसार व्हावा असाही त्यांचा हेतु नव्हता; तथापि त्यांनी केलेलीं कांहीं ईश्वर विषयक पदें व आरत्या वगैरे ज्या सांपडल्या त्यांतील थोड्या वेचक वैचक शेवटी दिल्या आहेत. ३ श्रीमोरयांचें वैराग्य, त्यांचें अध्यात्मिक ज्ञान, आणि त्यांस झालेला ईश्वरी साक्षात्कार या त्रयीचा आमच्या वाचकाच्या अंत:- करणावर थोडासा जरी ठसा उमटला तरी आमच्या लिहिण्याचा हेतु तडीस गेला असे आम्हौसमजूं. यांचें ग्रंथलेखनाचा माझा