पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४ ) च्या उकळ्या फुटल्या व आज माझे हातीं परब्रह्म मंगलमय श्रीचिंतामणिच्या जननभांडाराच्या किल्याच सांपडल्या असें त्यास वाटून परमानंद झाला. ३ श्रीमोरयांनी तपाची सांगता करून ईशाज्ञेप्रमाणे पुन्हा मोरगांवी जाण्याची तयारी केली व घेऊरकर ग्रामस्थांचा सप्रेम निरोप घेऊन ते परत मोरगांवीं येऊन पोंचले. प्रकरण सहावें. ६ मातृपितृनिधन. मरणं प्रकृतिः शरीरिणाम् || विकृतिर्जीवितमुच्यते बुधैः " " ( रघुवंश ) १ १ नरदेहाच्या अशाश्वतते बद्दल जी शिरोलिखित उक्ति आहे तिचें वैय्यर्थ कोण करूं शकणार आहे ? या जगांत ज न्मास येणें आणि पुनश्च मरणें हें चक्र नेहमीं चालूच आहे. श्री- मद्भगवद्गीतेतही देहाच्या नश्वरतेविषयों भगवंतांनी ह्मटलें आहे. जातस्या हि ध्रुवो मृत्युध्रुवं जन्म मृतस्य च 46 " हें चक्र परिवर्तन नेहमीं चालूच आहे ह्या गोष्टीकडे साधुसंतां- नीं विशेष लक्ष पुरवून आपला आयुष्य क्रमही तसाच रेखा- टलेला असतो. एका कवीनें एका ठिकाणी झटलें आहे:- सजातो येन जातेन । याति वंशः समुन्नतिम् ॥ परिवर्तिनि संसारे । मृतः को वा न जायते ॥ PY -