पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २३ ) भूत भगवद्भाव ठेवून स्वधर्म आणि भूतदया यांचा उत्तम परि- पोषकर हें परमेश्वराचे निघालेले उद्गार मोरयांनीं श्रवण करून श्रीचरणीं सखेदानंदानें विनंति केली की हे देवाधिदेवा मला आपण संसारांत घालता, परंतु तेणेंकरून मला आपल्या पाया: चा अंतर पडेल व मी मायामोहपाशांत गुरफटून जाईन तेव्हा मला ह्या संसारसंकटांतपडण्याची आज्ञा होऊं नये. आणि जर संसारांत घालणंच असेल तर जन्मकाळी आपण कोणतें चिन्ह धारण करून प्रकट व्हाल याची मला खूण पटावी. त्यावर प्रभु मोरेश्वर ह्मणाले "तुला मपंचापासून बाधा मुळींच होणार नाहीं व तुला परमार्थ साधण्याकरितां संसाराचा त्याग करण्याची किंवा पंचाग्रिसाधनासारखी साधनें करून अरण्यां- त बसण्याची मुळींच अवश्यकता नाहीं. प्रपंचांत राहून पूज्य मातापितरें व निराधार कलत्रपुत्र यांचें संगोपन करूनहि मान झी प्राप्ति करून घेतां येतें. मी जन्म घेतेवेळी खेचरी मुद्रा धारण करीन व माझे हृदयावर पंजाप्रमाणें शिंदुराचा पट्टा उमटेल. तूं आतां मोरगांवीं परत गमन कर आणि तेथें यथा- काळीं जो तुला प्रसाद मिळेल तो माझ्या स्वरूपाचाच आहे. असें समज, " 2 " २ प्रभुमुखांतून स्रवणाऱ्या मधुर उपदेशांमृताचे घुटके कर्ण रंधांनी घटाघट घेत असतां श्रीमोरयांच्या पोटांत अत्यानंदा-