पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२२) ) कर्तव्यपराङ्मुख होत नाहीत; उलट नेटानें संकटास टक्कर देऊन इष्टकार्य संपादन करितात. "न निश्चितार्थाद्विरमन्ति धीराः" या तत्वानुरूप श्रीमोरयांनीं जें घोर तप केलें त्याचें स्वादुफल त्यांच्या सातपिढ्यांपर्यंतच्या वंशजांना अनुभवण्या- स सांपडलें. असो. मागें सांगितलेल्या स्थावर क्षेत्रीं श्रीमोरयां- नीं आपली तपश्चर्येची जागा नीट स्वच्छ करून घेतली व तेथेंच ते स्थिर आसनकरून राहिले. त्यांची शरीरमकृति उत्तम असल्यामुळे त्यानां अनुष्ठानाचें कडकडीत व्रत पाळण्यास कालाचा किंवा स्थलाचा प्रतिबंध कधींहि झाला नाहीं. थंडी वाज्याची भीति त्यांस कशी ती नव्हती क्षुधाशमनार्थ काय करावें याची त्यांनी कधींहि चिंता केली नाहीं. श्रीमोरेश्व- रावर दृढ विश्वास ठेवून तपास आरंभ केला. तोंच त्यांची स माधि लागली ह्या स्थितींत त्यांचें बाह्यस्फुरण नाहींसें होऊन देहींच विदेहीपणा त्यांस भोगावयास सांपडला बेचाळीस दिव- स अन्नोदक विरहित समाधी लागलेली पाहून श्रीचिंतामणि परम संतुष्ट झाले. व त्यांनी त्यांस समाधियोगांतून जागृत केलें. आणि ह्मणाले "बा मोरया तूं या पुढें असले घोरतर तप करूं नकोस. ह्याच तपाच्या फलप्रात्यर्थ मी स्वेच्छेनें तुझे उदरीं जन्म घेतों. तूं आतां क्लेश भोगूं नकोस" व "प्रजा तंतुं मा व्य. वच्छेत्सीः" ह्या वेदानुज्ञेप्रमाणें गृहस्थाश्रमी हो आणि सर्वा-