पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २१ ) महिमा आहे. महाराज आपल्या मनोदयानुरूप आपण तप- श्चर्या करावी तुमची मनकामना निःसंशय पूर्ण होईल. हैं ऐकून त्यांनी तेथेंच तप करण्याचे ठरविलें. प्रकरण पांचवें. ५ तपश्चर्या. “ चणे खावे लोखंडाचे । मग ब्रह्मपदीं नाचे" ( श्रीतुकाराम ) १ ऐहिक किंवा पारमार्थिक कोणतें ही सुख संपादन कराव- याचें असल्यास तप हेंच मुख्यसाधन आहे मनुष्यप्राणि सुखा- ची इच्छा नित्य करीत असतो. परंतु त्याचें आचारण दुःख प्राप्त होईल इकडेसच गेलेलें असतें. त्यामुळे इष्टसुखप्राप्ति तर होत नाहींच परंतु उलट दुःखमात्र अनुभवावें लागतें. अल्पायासानें किंबहुना मुळींच कांहीं श्रम न करितां सिद्धि मिळावी ही कल्पना अगर्दी घातुक अतएव त्याज्य आहे. लोखंडाचे चणे खावेत तेव्हां कोठें ब्रह्मपद मिळते. हें भग- वद्भक्त साधु तुकारामाचें ह्मणणें कांहीं संशयात्मक नाहीं. मनुष्य प्राणि अहेतुकसुखाची आशा धरून कांहीं प्रयत्न करीत नाहीं. आणि मग सिद्धि प्राप्त झाली नाहीं, ह्मणजे तो थोडा- सा निरीश्वरवादी बनतो. परंतु तसा प्रकार साधूचेंठिकाण नसतो. त्यांस अनेक दुःखें जरी भोगावी लागलीं तरी ते