पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २० ) क्षेत्री तूं तपश्चर्या कर अशी मला गुरूंनी आज्ञा केली तेव्हा असा या क्षेत्राचा काय महिमा आहे तोही मला कथन करावा. मी ऐकण्यास फार उत्सुक झालों आहें ह्मणून त्यांची अत्याग्रह- पूर्वक विनंति केली त्यावरून ते ह्मणालेः- महाराज ! ५ या क्षेत्रास स्थावरक्षेत्र किंवा थेऊर असें ह्मणतात याचें साग्र वर्णन मुद्रलपुराण खंड ८ व गणेश पुराणांत आहे. ते सर्व कर- ण्यास आमची बुद्धि समर्थ नाहीं. याक्षेत्राचा स्वामी श्रीचिंता- मणि आहे. जगांतील अनंत तीर्थे अंशमात्रानें या क्षेत्रीं वास करितात. योगी, सुनि सुरासुर इ० ची येथें निरंतर वस्ति आहे या परम पवित्रक्षेत्रांत अनुष्टान केलें तर प्रत्यक्ष गजानन प्रसन्न होतात. इतर क्षेत्री एक हजार वर्षे अनुष्ठान केल्याचें पुण्य येथें एकच दिवसाच्या अनुष्ठानानें लाभतें. फारतर काय अश्वमेधाचें पुण्यही येथें प्राप्त होते. या गणेशतीर्थाच्या दर्श- नानें सद्गति मिळते. स्पर्शानें सायुज्यता लाधते. हैं गणेश पादो- दक ग्रहण केलें तर सर्वपातकांचा तत्काळ क्षय होतो. स्वानंद प्राप्ति मिळते. पुनर्जन्म येत नाहीं येथेंच शिवानें तप करून सिद्धि मिळविली त्यावरून तो सिद्धेश्वर नांव पावला तें स्थान हें पहा. गाणपत्यांस हैं क्षेत्र प्रयागासमान आहे ही मातृगया आहे. मोरगांव पितृगया आहे. या गणेशकुंडावर पिंडश्राद्ध केलें तर प्राणि मातृऋणांतून मुक्त होतो. असा या क्षेत्राचा -