पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९ ) वृत्ति झाली. नंतर योगिराजानीं त्यांस व्युत्थानावर आणि व ' तूं आतां यापुढें थेउरास जाऊन अनुष्ठान कर' अशी आज्ञा केली. ती मोरयांनी शिरसावंद्य करून मला या गुरुचर- •णाचा लाभ निरंतर होत जावा ह्मणून प्रार्थना केली. त्यावर मी तुला पुन्हा चिंचवड येथें याच वेषानें दर्शन देईन असें सद्गुरूंनी त्यांस आश्वासन दिलें व आपण अंतर्धान पावले. ४ हा सर्व वृत्तांत श्रीमोरयांनी घरी आल्यावर आपल्या व डिलांस व मातोश्रीस अत्यानंदानें निवेदन केला. आणि मला गुर्वानें तपश्चर्या करण्याकरितां घेऊर थेथे जाणें आहे तरी आपली आज्ञा असावी ह्मणून त्यांचे चरणीं विनंति केली. ती ऐकतांच त्या उभयतांस अत्यंत गंहिवर दाटला. त्यांच्या मुखा- वाटे एक शब्दही निघेना, मोहातिरेकानें ते अगदी वेडे होऊन गेले. अशी मातापित्यांची झालेली अवस्थापाहून श्रीमोरयां- सही अत्यंत प्रेम दाटलें तथापि विवेक करून त्यांनी त्यांचें समाधान केलें, व क्षेत्रस्थ परिचित मंडळीस त्यांचें यथायोग्य संगोपन करण्याविषयीं नम्रतापूर्वक सांगून अनुष्ठानास जाण्या- विषय आज्ञा मिळविली. नंतर सुमुहूर्त पाहून थेउरास प्रयाण केलें. वाटेनें जातांना जे चमत्कार झाले त्यांचे वर्णन पुढें चम- त्कारप्रकरणी वाचकांस कळून येईल, थोडक्याच दिवसांनी ते येऊर येथे येऊन पोंचले. गांवांत आल्यावर त्यांनी आपला तपश्चर्या करण्याचा हेतु ग्रामस्थांस निवेदन केला. आणि याच 4 matla