पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८ ) भूमीवर नेऊन पचवितो. या जगमान्य तत्वाला अनुसरून आप- णासही हा भवसमुद्र निर्धास्त उल्लंघन करण्यास कोणी तरी गुरु असावा अशा भावनेनें प्रेरित होऊन श्रीमोरया गोसावी यांना गुरु प्राप्तीची सारखी तळमळ लागून राहिली. २ शिष्याची अशी तयारी झाल्यावर मग सद्गुरु कांहीं लांब नाहींत, पिकलेल्या फळास भक्षण करण्याकरितां जसे पक्षी तयार असतात तसेच अनुग्रह पात्र सच्छिण्यास उपदेश कर- ब्याकरितां रुद्गुरु जणुं काय एका पायावर उभेच असतात. श्रीमोग्यांची अशी स्थिति पाहतांच एके दिवशीं अकस्मात् श्री योगिराजसिद्ध नामक सद्गुरूंनी त्यांस आपल्या दर्शनाचा लाभ दिला. श्रीमोरयांनी ती दिव्य मूर्ती प्रगट झालेली पाह- बांच त्यांचे पदीं तत्काळ वंदन केलें, आणि अतिदीन वद- जानें योगिराजांचे चरणीं आपला मनोदय निवेदन केला. ३ योगिराजांनी श्रीमोरयाचें तें मृदु भाषण, मर्यादशीलपणा ब्रह्मज्ञानसंपादन करण्याची उत्कट इच्छा व दृढनिश्चय हीं पाहून हा सच्छिष्य अनुग्रहपात्र आहे असें जाणिलें आणि हा आपल्या कसोटीस पूर्णपणे उतरेल असें समजून कृपेनें त्याचे मस्तकी वरदहस्त ठेविला. नंतर ध्यानधारणादि योगसाधन- विधि सांगून मंत्रोपदेश केला. तो श्रीमारयांनी एकाग्रचित्तानें ग्रहण करितांच त्याचा देहभाव गलित होऊन तेथेंच त्यांची समाधी लागली, आणि ' सर्व ब्रह्ममयं जगत् ' अशी तदाकार ●.