पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१७) अंगच्या गुणाची व बुद्धीची प्रशंसा लोकांच्या तोंडून ऐकून वामनभटजींच्या अंतःकरणांत आनंदाचे उमाळे उठत. पार्वती- बाईनीं तर मीठ मोहन्यांनी त्यांची वारंवार दृष्ट उतरावी.. ७ श्रीमोरयांनी फावल्यावेळीं पूर्वश्रुत गोष्टींचा एकांती बसून एकाग्र विचार करावा. आणि ध्रुवास जसी दृढ निश्चयाच्या योगानें ईश्वरप्राप्ति झाली तशी आपणही प्रयत्नानें व दृढ़ निश्चयानें करून घ्यावी असे त्यांनी मनात ठरवून तदनु- सार ते त्या प्रयत्नास लागले व तो त्यांचा प्रयत्न ही सिद्धीस गेला हें पुढें कळून येईल. व प्रकरण चौथें. ४ गुरुदर्शन योग. सद्गुरु वांचोनी सापडेना सोय । धरावे ते पाय आधी आधी " ( श्री तुकाराम ) १ या दुःखमय संसारसागरांतून तरून जाण्यास सद्गुरूच्या कृपानौकेवांचून अन्य साधन नाहीं. अंधारांत चाचपडत चा- लणाऱ्या मनुष्यास जसा दीप किंवा समुद्रांतून चालणाऱ्या नौकेस मार्गदर्शक दीपस्तंभ तसा सद्गुरु हा संसाररूप निबिड- तमांत मार्ग दाखविणारा सूर्यच होय. व्यावहारिक दीप हा फक्त जडाँधकाराचाच नाश करितो. पण सद्गुरुदीपक हा अज्ञान तिमिराचा नाश करून ज्ञानमय अशा प्रकाशमान्