पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१६) सांत संहिता, जटा, घन इ० तत्कालीन विषय अगदीं मुखो- द्रत केले. वेदाध्ययनाचेवेळी त्यांची शीघ्र ग्राहकता पाहून गुरूंनी फार आनंदानें त्यांची नेहमीं वाहवा करावी. " वसंत ऋतूंत आश्रमंजियांचा परिमळ जसा सर्वत्र भरून राहतो " तसें त्यांचें बुद्धितेज अंतःकरणांत न मावल्यामुळे तें बाहेर सर्वत्र पसरून राहिलें आणि " घेईल ज्या गुणांला तो गुण मति वेष्टुनीहि फांकेल " ह्या आर्यार्धाप्रमाणे त्यांच्या बुद्धीनें ज्या गुणाला एकदां धारण केलें. तोच गुण ती विस्तृत करीत गेली. अल्पावधीतच त्या लौकिकगुरुपासून मिळण्यासारखी विद्या त्यांनी संपादन केली. किंबहुना ? "अनेकजन्मसंसिद्धिस्ततो याति परां गतिम् " या भगवदुक्तीप्रमाणे त्यांची पूर्वजन्मींची आगाऊच सात्विक संस्कारांची तयारी होती ती या जन्मांत एकदम फली- भूत होऊन जगाच्या कल्याणासाठी उद्भूत झाली असें ह्मटलें असतां चालेल. श्रीमोरयांनी आपल्या मातापित्यांची आज्ञा कर्धीही उल्लंघन केली नाहीं. त्यांची सर्वतोपरी शुश्रूषा करून त्यांस संतुष्ट राखण्यास ते तत्पर असत हे पाहून वामनभटजीस आपल्या वृद्धावस्थेंत असा सुशील, आज्ञाधारक बुद्धिमान् व सद्गुणिं मुलगा लाधला, ह्मणून फार समाधान होई. मुलाच्या T .