पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५) ह्यांच्या मनास फारच चिंता उत्पन्न झाली व त्यांनी अनन्य भावानें श्रीमोरेश्वरास शरण जाऊन आपल्या एकुलत्या एक पुत्रास त्यांतून वाचविण्याविषयीं प्रार्थना केली. त्यावेळी ते त्यांतून निभावतील असें कोणांसही वाटत नव्हते परंतु श्री मोरेश्वरांस वामनभटजींची करुणा येऊन त्यांनी गोसाव्याच्या रूपानें प्रगट होऊन श्रीमरियावर आलेल्या अरिष्टाचें निर- सन केलें. व त्यांस कफनी, पादुका व मंत्र देऊन ते अंतर्धान पावले. - ४ श्रीमोरयांनीं परमभक्तीनें श्रीनी दिलेला प्रसाद ग्रहण केला व ते त्याच - गोसाव्याच्या वेषानें वर्तन करूं लागले. तेव्हां पासून त्यांस श्रीमोरया गोसावी हें नांव प्राप्त झालें. आपल्या मुलावर आलेल्या अरिष्टाचें परमेश्वरानें स्वतः येऊन निरसन केलें हैं पाहून वामनभटजीस जो आनंद झाला तो काय वर्णावा ? त्याची कल्पना सहृदय वाचकच करोत. असो. ५ वामनभटजीनीं श्रीमोरयांस आठवें वर्ष लागतांच त्याचा विधिपूर्वक व्रतबंध संस्कार यथोचित थाटामाटानें केला. व त्यास थोडँ बहूत शिक्षण स्वतः देऊन नंतर एका विद्वान् मुशील गुरूच्या स्वाधीन पुढील अध्ययनाकरितां केलें. श्रीमोरयांनी आपल्या गुरुची व गुरुपत्नीची एकनिष्ठपणे सेवा करून त्यांची प्रीति संपादिली. स्नानसंध्यादिक ब्रह्मकृत्याचा ओनामा त्यांस बालपणच झाला असल्याने त्यांनी थोडक्याच दिव