पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १४ ) युक्त दुःखाचें आणि त्रासाचें परिमार्जन व्हावें, हें साहजि- कच आहे. २ श्रीमोरया हे बालपणापासूनच फार बुद्धिवान् व श्रद्धाळू होते. ह्यांच्या बुद्धीची व्यापकता आणि ईश्वरविषयक भक्ति ह्या अगदी जन्मसिद्धच होत्या फारतर काय ही जोड त्यांना पूर्वजन्मींच लाधलेली होती, असें ह्मटलें असतां चालेल. मोरयास बाळपणीसुद्धां अश्लाघ्य बाळलीला किंवा व्यर्थ हट्ट कसातो माहीत नव्हता. त्यांची वृत्ति इतर मुलांप्रमाणे क्रीडा करण्याकडे नसून परमार्थाकडे वळलेली होती. त्यांचे ठिकाणी देव, ब्राह्मण व साधु यांचे विषयीं पूज्यबुद्धि, सत्य- प्रियता, मनाचा मोकळेपणा, शांति आणि निरभिमानता हे गुण मूर्तिमंत वास करीत होते. त्यांचा लहानपणचा क्रम समवयस्क मुलें जमवून बरोबर पाषाणाचेच टाळ घेऊन दिंडी काढावी व लहान काड्यांस चिंध्या अडकवून त्या पताका खांद्यावर घेऊन मुखानें गणेशनामाचें भजन करावें असा होता. हैं ग्रामस्थांनी पाहून त्यांचें फार कौतुक करावें. आणि हा मुलगा पुढे मोठा भगवद्भक्त होईल असें मुखानें नेहमीं ह्मणावें. ३. मोरयाचे वयास पांच वर्षे पूर्ण होतात न होतात, तोंच त्यांच्या आयुष्यमर्यादेवर एक मोठे घोरतर- गंडांतर अक स्मिक येऊन धडकलें. त्यावेळी वामनभटजी व पार्वतीबाई -