पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३) म आचरण इत्यादि सगुण ज्या कुळांत जन्मसिद्ध मुरलेले असतात त्यांतच श्रीमोरयासारखा अद्वितीय महात्मा- पुरुष जन्मास येतो. अनेक पिढ्यांत केलेले तपाचरण असल्या- महापुरुषाच्या अवतारानें फलद्रूप होतें. असो. हेंच मोरया आमच्या ह्या चरित्राचे नायक होत. प्रकरण तिसरें. बालपण. " प्रसादचिह्नानि पुरः फलानि " ( रघुवंश ) गोसावी यांच्या आयुष्यांत कसें विस्तृत दिसून येईलच. 'भविष्यत् असतो. ' हें तत्व कालिदासानें आपल्या १ वरील अवतरणांतरगत सिद्धांताचें उद्घाटन श्रीमोरया- रीतीनें झालें हें पुढें कालाचा उदय तत्पूर्वचिन्हांकित रघुवंश काव्यांत सर्वमान्य होईल अशा रीतीनें वर्णिलं आहे. आणि तें आ- पल्या ह्या चरित्रनायकाच्या कीर्तीला अगदीं अनुरूप असेंच आहे यांत संशय नाहीं. श्रीमोरयांनीं बालपणांत आणि पुढें जे यौगिक चमत्कार करून दाखविले आणि आपलें अचाट दैवी सामर्थ्य जगाच्या निदर्शनास आणून दिलें त्याचें मूळ त्यांच्या बाळपणांतच जागोजाग दृष्टीस पडत होतें. असो. असले पुत्ररत्न प्राप्त झाल्यामुळे वामनभटजींच्या पूर्व-