पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२) नक्षत्र द्वितीयचरणी पुत्ररत्न प्राप्त झालें. साध्वी पार्वतीबाई पुत्रमुखावलोकन करीत असतां तिला शुंडादंडमंडित गणेशमूर्ति दिसल्याचा क्षणैकमास झाला व ती तन्मय होऊन गेली. तिला पूर्वदत्तवराचें व शकुनगांठीचें स्मरण झालें. आणि प्रत्यक्ष श्रीगणेशमूर्तीनें आपल्या उदरीं जन्म घेतला ह्मणून ती धन्यता पावली. इतक्यांत गणेशांनी पूर्वस्वरूप सोडून व्यावहारिक मानवरूप धारण केलें. ६ पुत्ररत्न प्राप्त झाल्याचें वृत्त वामनभटजीस समजतांच तो मोठ्या कौतुकानें पुत्रमुख पाहण्यास आला व पुत्रमुखावलो- कन करीत असता त्यास जो आनंद झाला तो त्रैलोक्यांत मावेना. तो श्रीमोरेश्वरांचें वारंवार स्तवन करून दंडाप्रमा- णें भूमीवर पडला व कृतार्थ झाला नंतर व्यावहारिकरीतीनें ग्रामस्थांसहवर्तमान वामनभटजीनें यथोचित पुत्रजन्मोत्सव- सोहळा केला. बारादिवस पूर्ण पार पडतांच मुलाचा नामकरण- विधि केला. व 'मोरया' असें त्याचें नांव ठेवून शर्करा वांटली. ५ ज्या कुळाला सदाचाराचें अगदी साधें वळण लागलेलें असतें. त्यांत जन्म पावलेला व वृद्धिंगत झालेला मनुष्य चां- गल्या आचरणांनी युक्त असाच आढळतो. श्रीमोरयासा- रख्या योग्यांचा जन्म वाटेल त्या कुळांत खात्रीपूर्वक व्हावया- चा नाहीं. ईश्वरावर निस्सीम श्रद्धा, परमेश्वर प्रेम एकभाव उत्त-