पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११) " चवथें उग्र तप आरंभिलें, त्यासही बारा वर्षे पूर्ण होतांच " माते पेक्षाही मनाचा कोमळ श्री मोरेश्वर मनांत कळवळला व त्यांनी मी तुझी निस्सीमभक्ति पाहून संतुष्ट झालों आहें "तुझेनशिबीं पुत्रतर नाहींच परंतु आतां केवल मदिच्छेनेंच मी "तुझेठिकाणी मानवरूपार्ने अवतरून जगदुद्धार करीन असा स्वमदृष्टांत दिला. वामनभटजी जागृत होऊन पाहतो तों कोठें कांहीं दिसेना. नंतर आतुरतेनें हा घडलेला सर्व वृत्तांत त्यानें मोठ्या उत्कंठेनें आपले पत्नी- स निवेदन केला. त्या महासाध्वीस श्रीमोरेश्वर आपले उदरीं जन्म घेणार ह्मणून फारच आनंद झाला व त्या आनंदाचे भरांत तिनें आपल्या पल्लवास शकूनगांठ बांधिली. नंतर त्या उभयतांनीं मोरेश्वराचें यथोपचारपूजनस्तवन करून त्यांचे चरणीं लोळण घेतली व झालेला दृष्टांत लवकर खरा व्हावा ह्मणून करुणा भाकली. थोडक्याच दिवसांनीं पार्वती- बाई गर्भवती झाली. दिवसेंदिवस गर्भ वृद्धिंगत होत जाऊन तिला रात्रंदिवस ईश्वरभजन करावें, व पताका घेऊन यात्रेस जावें इ० डोहोळे होऊं लागले. नवमास पूर्ण होतांच श्रींच्या कृपेनें पूर्वोक्त दृष्टांताप्रमाणें. श्रीमन्शालीवाहन शके १२९७ विधानाम संवत्सरे मिति माघ शु. ४ मध्याह्न काळीं भृगुवासरी रेवती