पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०) रेश्वराचें दर्शन घेऊन त्याची अनन्यभावें स्तुति केली. नंतर उभयतांनीं क्षणैक विचार करून आपली पुत्रकामना येथेंच परि- पूर्ण होईल अशा भावनेनें वास्तव्य करण्याचे ठरविलें. आणि नदीतिरी एक निरुपद्रवी जागा पाहून वामन भटजीनें ग्राम- स्थांच्या मदतीनें एक लहानशी पर्णकुटिका तयार केली व ते दोघे उभयतां आत्यानंद पुरस्सर तेथेंच राहू लागले. ३ वामनभटजी मोठा कर्मठ, देवभक्त व सत्यवादी मनुष्य आहे अशी लवकरच सर्वांची खात्री झाल्यामुळे ग्रामस्थलोकांपैकी बरेच लोक त्यांचा यथाशक्ति परामर्ष घेऊं लागले. वामन भटजीचा नित्यक्रमः- ब्रह्मकमंडलूचें स्नानपान, देवदेवतार्चन, श्री मोरेश्वराचें पूजनस्तवन, प्रेमाचें भजन आणि नंतर भिक्षा- शन असा असे. असा क्रम नित्य चालला असतां त्या उभय- तांनीं कांहीं दिवसांनी भाद्रपदमासी ग्रामस्थांबरोबर ४ दिवस- पर्यंत द्वारयात्रा केल्या. शेवटी सांगता करून वामन भटजीनें पुत्रकाम नेच्छेनें सुमुहूर्ती अनुष्ठानास आरंभ केला. बारा वर्षे पूर्ण अनुष्ठान झाल्यावर भगवान् श्री मोरेश्वर यांनी स्वप्नदृष्टांत दिला कीं, "तुला पुत्र होणार नाहीं " वामनभटजीनें पुनः अनुष्ठानास आरंभ केला. त्यास बारा वर्षे पूर्ण होतांच पूर्वोक्त दृष्टांत झाला. याप्रमाणें तीन तपें पूर्ण झालीं तरी पुत्रप्राप्ति- वर झाला नाहीं. शेवटी त्यानें दिलगीर व निराश होऊन