पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९) याचा महिमा वर्णन करण्यास प्रत्यक्ष ब्रह्मदेवही धकले मग आम्ही पामरांनी त्याचें किती वर्णन करावें. या क्षेत्राचा अधि पति श्रीएकदंत आहे जो केवळ देवतात्रयींचें जन्मस्थान - ॐका- रवदन तोच येथें प्रत्यक्ष वास करतो हें केवळ स्वानंद- भुवनच आहे याठिकाणीं काश्यादि सकळ क्षेत्रे व त्रिभुवनवंद्य सर्व तीर्थे आपापल्या अंशानें सदैव वास करितात. प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णु महेश हेही येथें अंशभूत होऊन राहिले आहेत. ही ब्रह्मकमंडलू नदी ब्रह्मदेवाचा सर्वतीर्थमिश्रित कमंडलू सांडून निर्माण झाली आहे. हिला प्राकृत लोक 'कन्हा' असें म्हणतात. फार काय सांगावें ? हें चारी मुक्तींचे केवळ माहेरघरच आहे. या क्षेत्रीं जो देह ठेवितो त्यास पुनरावृत्ति नाहीं असें जाणून इतर क्षेत्रांतून हजारों लोक येथें मुक्ति मिळ- ण्याकरिता आले व त्यांनी आपले देह येथेंच ठेविले आहेत. त्यांच्या ह्या समाधी पहा. या नदीतीरी तप- चर्या करणारे निर्विघ्नपणानें मुक्तीस जातात. या क्षेत्रांत अनुष्ठान करणारे लोक कार्यसिद्धि पावल्यावांचून राहि- लेच नाहींत. "

या प्रमाणें ग्रामस्थांचें भाषण श्रवण करून वामन भटजीनें हर्षित होऊन पत्नीसह त्या ब्राह्मणांस वंदन करून, त्यांचे आशीर्वाद घेतले, आणि तात्काळ देवालयांत जाऊन श्री मयु-