पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८) दुःखें सोसावी लागलीं. अखेरीस थोडक्या दिवसांनी ते फिरत फिरत शके १२५२ सालों स्वानंदपूर क्षेत्री (मोरगांवीं ) येऊन पोंचले. त्यावेळी वामनभटजीचें वय सुमारें ५० वर्षांचें असावें. २ गांवानजीक नदीतीरावर त्यांनी कांहीवेळ विश्रांती घेतली नंतर त्याच ब्रह्मकमंडळुनदीत स्नानादिक विधि उरकून आपले भुकेनें व्याकुळ झालेले पंचप्राण तिच्या उदकप्राशनानें कसे- बसे शमविले. इतक्यांत त्याठिकाणी कांहीं ग्रामस्थ नित्य व्यवहारार्थ येऊन पोंचले. वामनभटजीनें त्यास सप्रेम नम- स्कार करून या क्षेत्राचें नांव व महिमा यांची त्यांजवळ विचारपूस केली. त्यावरून ग्रामस्थांनी त्यास त्या क्षेत्राचा महिमा सांगितला त्याचा सारांश असाः-- -- ते ह्मणाले. " 'महाराज - या क्षेत्राचें नांव स्वानंदपुरी. ( मयूरपुरी किंवा मोरगांव) असें आहे. हें नांव प्राप्त होण्याचें कारंण एकदां देवांनी कमलासुरास मारण्याकरितां यज्ञ केला. यज्ञाँतून तेजोमय मयूर उत्पन्न झाले, देवांनी त्यांचें वाहन करून त्या कमलासुराचा वध केला. त्यावरून या क्षेत्राचें नांव मयूरपूर किंवा मोरगांव अर्से पडून देवाचें नांवही मोरेश्वर अर्से पडलें. या क्षेत्राचा महिमा अगाध आहे. मुद्गल पुराणांत या मयूरक्षेत्राचें सविस्तर महात्म्य कथन केलें आहे