पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(७) आहेत. श्रीतुकारामाच्या शिरोलिखिततत्वाचें खरें रहस्य हेंच आहे. अशा ह्या पवित्रतम भूमीत सुमारें सहाशे वर्षांपूर्वी कर्नाट कदेशांत बेदराजवळ 'शाली' नांवाच्या खेडेगांवांत वामनभट्ट नांवाचा आश्वलायनसूत्र हरितसगोत्रोत्पन्न देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण रहात होता. त्याचें उपनांव शालिग्राम असें होतें. याच्या बालपणची व पूर्वजांची विश्वसनीय प्रति- - माहिती मिळत नाहीं. तथापि तो मोठा भासंपन्न, सदाचारी, विद्वान्, स्वधर्मनिष्ठ व महान् भगव- द्भक्त असा होता. त्याची पत्नि पार्वतीबाई ही सुशील, पतिसेवापरायण, साध्वी व प्रेमळ होती त्यांचे घरची फार गरिबी असल्यामुळे त्यास अन्नवस्त्रांची फारच टंचाई पडे. म्हणून तो आपला उदरनिर्वाह केवळ भिक्षावृत्तीवरच करीत असे, त्याला पुत्रसंतान वगैरे नसल्यामुळे त्याचें लक्ष मपंचांत नसे, वामनभट्ट पत्नीसह आपला सर्वकाळ ईश्वरभजनांत घालवीत असे. शेवटीं अशा ह्या कष्टमय स्थितीला कंटाळून त्यानें कोठेंतरी देशांतरास जावें व ईशकृपेनें एखाद्या क्षेत्रीं सद्गुरूची गांठ पडल्यास तेथेंच काळ घालवावा असा दूरवर विचार केला. पार्वतीबाईसही तो विचार पटला, नंतर त्यानें सर्व व्यवस्था व निवानिरव करून गाँव सोडला वाटेनें येतांना त्या उभयतांस भयंकर अरण्यांतून प्रवास करावा लागून फार