पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहेत. गोरगरीब, अतीतअभ्यागत, बैरागीफकीर, अंध- पंगू, इ० लोकांकरितां अन्नसत्र व सदावर्त संस्थानांतून चालू आहेत. व त्यांचा उपयोगही शेंकडों लोक करून घेत आहेत. ३ एकंदरीत हा गांव कोणीही पाहिल्यावर परम संतोष- दायक असाच वाटतो. अशी ही रमणीय व पवित्र भूमि पाहून श्रीमंगलमूर्तीनें श्रीमोरया गोसाव्यांस श्रीमद्भगवद्गीतेतील वरील उक्तीप्रमाणें वास करण्याची आज्ञा केली ती सर्वथैव योग्यच होय. ४ पुढील चरित्रभाग क्रमशः दिलेला आहे त्यावरून सर्व गोष्टींचा खुलासा वाचकांच्या सहज ध्यानांत येईल. प्रकरण दुसरें. कुलवृत्तांत. "पवित्र तें कूळ पावन तो देश । जेथें हरिचे दास जन्म घेती" श्रीतुकाराम १ या अवाढव्य सृष्टींत आपल्या आर्यभूमीचें जें विशेष मह, त्व आहे. त्याचें कारण तींत आजपर्यंत जे पुण्यपावन सत्पुरुष होऊन गेले हें आहे. हिंदुस्थानाशिवाय जगाच्या कोण- त्याही भागांत हें साधुत्वाचें बीज इतक्या उत्तमरीतीनें उद्भू- त झालेले नाहीं. देश तसेंच कूल हीं दोन्हीं या हरिभक्तांनी आपल्या निर्मळ व पवित्र आचरणांनीं जगद्वंद्य करून सोडिलीं