पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(५) जलानें श्रीमोरयांस स्नान घालिते. देवालयाचे पाठीमागें नदीवर निरनिराळे घाट बांधलेले आहेत ते त्रिकाळ मनुष्यांच्या गर्दीनें फुलून गेले असतात. त्यावर कोणी कर्मनिष्ठ स्नान करून ललाटपटली विभूति चर्चून संध्यावंदन करितात, तर कोणी पवनाबाईंत धडाधड उडचा टाकून मत्स्य सुसरी इ० जलचरांममाणे पोंहत आहेत. तर कोणी लगबगीनें तांब्यांत पाणी घेऊन जातां जातां शिवलिंगावर घालून श्रीमोरयांचे मस्तकीं शमी दुर्वांकुर ओलेत्यानेंच अर्पण करीत आहेत इकडे ब्राह्मणमंडळी श्रीमोरयापुढील मंडपांत बसून आवर्तनें करीत आहेत, कोणी सुवासिनी व विधवा पवनाबाईचें स्नान करून मोरयास प्रदक्षिणा घालीत आहेत, कोणी पाणी नेत आहेत असें सर्व देऊळ व सर्व घाट प्रत्यहीं गजबजलेला आढळतो. तेथें बसून सृष्टिदेवतेकडे आसमंतात् दृष्टि फेकिली असता जो आल्हादजनक व चित्तापहारी देखावा दृष्टिगोचर होतो तो अगदी अवर्णनीय आहे. दोहों बाजूला लहान लहान डोंगरांच्या रांगा, वृक्षांची गर्द झाडी आणि तींतून शांतपणानें वाहणाऱ्या पवना नदीचा प्रवाह पाहून या क्षेत्रांत निरंतर वास करून श्रीमंगलमूर्तीच्या दर्शनपूजनाचा अखंड मंगलमय लाभ करून घ्यावा अशी यात्रेकरू प्रेक्षकांच्या मनाची भावना होते. प्रवासी लोकां- करितां या देवळांचे संन्निधच २/३ धर्मशाळा मठ वगैरे बांधले