पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ४ ) दक्षिणेस व उत्तरेस दोन भव्य पटांगणे आहेत, यांत पूर्वी बाग होते. हल्लीं येथें त्यांचा उत्सवप्रसंगी ब्राह्मणभोजन पाकशाळा व दुकानें यांजकडे उपयोग होतो. देवळाच्या उत्तरेस राजबिंडा या नांवाचे दोन लहान मोठे खडक आहेत. या खडकांवर महाराजांची व कोणा मराठी सं० भेट झाली ह्मणून हें नांव त्यास पडलें. गांवाभोंवतीं जकातीचीं नाकी पूर्वी होती तसेंच एक टांकसाळ असून चिंचवडी नाणीं चालू असत. आतां हें सर्व बंद आहे. मुख्य देऊळ श्रीमोरयांचें असून त्यांचे पुत्रपौत्रादिक सात पुरुषांची देवळें त्याला लागून बांधिलीं आहेत त्यामुळे श्रीमोरयांचा परिवार एक- समयावच्छेदेंकरून दृग्गोचर होतो. दत्तक पिढीचें देवालय तुटक बांधलें आहे. श्रीचिंतामणिमहाराज व श्रीनारायण- महाराज यांची देवळें इतर देवळांपेक्षां खोल असल्यानें त्यांत पावसाळ्यांत नदींतील पाणी झिरपून सांचते. सांचलेलें पाणी काढून टाकण्याकरितां देवळाबाहेर उच्छ्रास केले आहेत. त्यांतील पाणी काढलें ह्मणजे देवळांतील पाणी आपो- आप कमी पडतें. पवनानदीस पूर आला ह्मणजे सर्व देवळें पाण्यात बुडून जातात. त्यावेळी नदीचे पात्राचा जो भया- नक परंतु चित्ताकर्षक देखावा दिसतो तो खरोखर अवर्णनीय आहे. पवनाबाई वर्षांतून दोन तीन वेळ तरी आपल्या पवित्र