पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) वेशीबाहेरील भागी बरीच मोठी वस्ती झालेली आहे, त्यांत बाजारपेठ प्रसिद्ध आहे. या गांवांत मुख्य वस्ती ब्राह्मणांची असून इतर जातींचा भरणाही बराच मोठा आहे. गांवाची रचना चांगली असून येथें व्यापारधंदाही बराच चालत असतो. आसपासच्या ( पांच सहा कोशपर्यंतच्या ) खेड्यांत येथून माल पुरविला जातो. गांवच्या लोकांची रहाणी शहर- वजा असून बरीच घराणी सुखवस्तु व इनामदारांची आहेत. एकंदरीत सर्व लोक खाऊन पिऊन सुखी आहेत. २ गांवांत बरीच देवालयें आहेत पैकीं श्रीमारुती व श्रीभै रवनाथ यांची देवळें चांगल्या स्थितीत असून त्यांचे उत्साहांस संस्थानांतून कांहीं मदत मिळत असते. श्रीमन्मंगलमूर्तीचें मुख्यस्थान गांवाचे दक्षिणेस असून त्यास वाडा ' अशी संज्ञा आहे. यांतच संस्थानची कचेरी असते. श्री मोरयागो- सावी व त्यांचे पुढील सात वंशज यांची समाधिमंदिरें अगदीं नदीच्या पात्रांत असून त्यांतच त्या सत्पुरुषांच्या समाधी आहेत. देवळांची रचना अशी सुंदर बनविली आहे की ती पाहिली असत पूर्वीच्या शिल्पकलेची व कारागिरांच्या बुद्धि- मत्तेची साक्ष पटते. देवळांच्या भोंवती दगडांचा चुनेगच्ची भक्कम तट असून तो आज २/३ शेवर्षे टिकला आहे, ह्याव- रून त्याच्या कामाची कल्पना सहजच होईल. देवालयांच्या