पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२) हा पूर्वी चिंचवाडी ह्या नांवानें गणला जात होता. हें नांव पडण्याचे कारण बहुधा येथे असलेल्या चिंचांच्या वृक्षांची विपुलता है असावें व याच अर्थाचें द्योतक ह्मणून चिंचवडे ह्या उपनांवाचे ह्या गांवीं पाटीलही आहेत. त्याकाळी येथें अरण्यमय असा बराच मोठा भाग असावा आणि ह्मणूनच तो श्रीमोरया गोसावी यांनीं आपणांस एकांतवास मिळावा ह्मणून पसंत केला. पुढे कालमानानें एकंदरीत सुधारणा होत गेल्यानें त्याच्या नांवांतही बदल होऊन तें चिंचवाडीचें ‘चिंचवड ' या हल्लीच्या नावाने प्रसिद्ध झालें. श्रीमन्मोरया - गोसावी यांनी वास केल्यापासून तर या गांवाची महती महाराष्ट्रांत चौहींकडे पसरली गेली. ह्याच्या भोवतालचा प्रदेश फारसा डोंगराळही नाहीं व सपाटही नाही. आसपास जिराईत बागाईत जमिनी असल्यामुळे व पवनानदी दक्षिणवा- हिनी होऊन या गांवास वळसा घालून गेल्यामुळे त्यास सृष्टि सौंदर्याची अवर्णनीय शोभा प्राप्त झाली आहे. याची कल्पना प्रत्यक्ष अवलोकन केल्यावांचून येणार नाहीं. गांवची एकंदर वस्ती सध्यां दोन हजारांवर असून ग्रामसंरक्षणार्थ पूर्वी चांगला मजबूत तट असावा असें हल्लीं अवशिष्ट राहिलेल्या त्याच्या भागावरून दिसून येतें. गांवास दोन चार वेशी असून परिस्थितीच्या प्रतिकूळतेमुळे त्यांपैकी एकदोन अगदीं नामशेष होण्याच्या स्थितीस येऊन पोंचल्या आहेत. हड्डीं