पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिलें. १ श्रीक्षेत्रचिंचवड. " शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः "" ( श्रीमद्भगवद्गीता ) १ सृष्टिसौंदर्य हा परमेश्वराचें स्वरूपदर्शक असा आदर्शच आहे. सृष्टिदेवतेचीं अनेकविध दृश्यमान स्वरूपें पाहून कोणा- चेंही अंतःकरण उचंबळून गेल्याशिवाय राहणार नाहीं !! आणि ह्मणूनच आपल्यांतील उत्तम उत्तम कवींनीं तिचें मनोहरस्वरूप काव्यांत रंगविलें आहे; किंबहुना ईश्वर हा सृष्टिरूपानेंच केवळ नटून राहिला आहे असा भास होतो. त्यांतूनही काश्यादिक्षेत्रांच्या योगानें तर त्या सृष्टिदेवतेला विशेष पावित्र्य आले आहे. हिमाचलांतून उत्पन्न होणारी गंगा, अमरकंटकांतून निघणारी नर्मदा, दक्षिणेत वाहणारी कृष्णा इत्यादि नद्यांनी आपला हा आर्यावर्त देश सुशोभित करून सोडिला आहे. अशा या पवित्रतम स्थलभागांपैकी पुणे जिल्ह्यांत चिचवड हें एक क्षेत्र आहे. तें पुण्याहून मुंबईस जातांना जीं स्टेशनें लागतात त्यापैकी तिसरे असून तेथून पश्चिमेस सुमारे दीड मैलांवर हा गांव वसला आहे. जरी फार मोठा नाहीं, तरी फार जुनाट असावा असे वाटतें. गांव