पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





७२   चार चरित्रात्मक लेख.

____________________________________________________

दरिद्री पण भाग्यवशात् लक्ष्मीवंताच्या आश्रयास असलेल्या व जितका जितका

खालच्या पायरीचा मनुष्य असेल अशाला तर तो अगदींच बेहोष करून सोडतो.

जावजी हे लक्ष्मीवंताचे आश्रयास होते व पुढे स्वतःही पुष्कळ धनवंत झाले.

परंतु त्यांच्यावर या मदाची काडीभरही छाप पडली नाहीं. ते आमरणान्त जशाचे

तसे साधेच राहिले. अनुकरणीय गुणांनी मंडित होते ह्मणूनच ते इतक्या योग्य-

तेस व लौकिकास चढले. आणखी कांहीं कालपर्यंत जावजींनी वांचले पाहिजे

होतें. त्यांच्या मनांतून जितकी कृत्ये करावयाचीं होती तितकी जर त्यां-

चा आयुर्दाय असता तर त्यांनी खचित केली असती. प्रौढबोध, इतिहाससंग्रह

वगैरे महत्कृत्यांचा त्यांचे हयातीत आरंभ झाला असता तरी बरेंच कार्य झालें

असतें. पण आतां त्याचा काय उपयोग?

 जावजी तर गेलेच. त्यांच्या अंगी अनुकरणीय व उपयुक्त असे पुष्कळ गुण

होते. त्या गुणांचा अनुकार करून सर्वांनी प्रतिजावजी होण्याचा यत्न करावा ह्मणजे

जावजींनी जसे आपल्या देशाचे एका बाबतींतील पांग फेडण्याचें श्रेय मिळविले.

याप्रमाणे त्यांसही श्रेय मिळेल.

 अखेरीस जावजींचे आत्म्यास अखंड परमेश्वर शांति व सौख्य देवो अशी

मन:पूर्वक प्रार्थना करून त्या मित्राचे स्मरणास हा लेख अर्पण करितों.