पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





   विविधज्ञानविस्तार.


 मराठीमध्ये आज जी मासिक पुस्तकें अस्तित्वात आहेत त्यांत

विविधज्ञानविस्तार है वयाने आणि योग्यतेने प्रथम पद पावले आहे.

१९०८ सालापासून यास ३९ वें वर्ष सुरू झाले. प्रस्तुत काली महा-

राष्ट्रांत विद्वान् आणि बहुश्रुत ह्मणून नावाजलेल्या लेखकांचे यांत

लेख येत असतात. अशांपैकी काहींची नांवें:- रा. रा. विष्णु मोरेश्वर

महाजन, एम. ए., शिवराम सिताराम वागळे. वी. ए. एल्. एल्. बी.,

चिंतामण विनायक वैद्य, एम. ए., एल्. एल्. सी., मंगेश जिवाजी

तेलंग, बी. ए., एल. एल. बी , विनायक कोंडदेव ओक,

नारायण देव, वासुदेव गोविंद आपटे, बी. ए., श्रीपाद कृष्ण

कोल्हटकर, बी. ए., एल्. एल. बी., महादेव व्यंकटेश लेले,

बी. ए. एल. सी. ई., नरसिंह चिंतामण केळकर, बी. ए., एल. एल.

बी., डा० अनंते नारायण सांबारे, एल. एम. एस्., गणेश रघुनाथ

अभ्यंकर, बी. ए., एल. एल्. बी .

 हैं मासिक पुस्तक मूळ जेव्हां अस्तित्वात आले तेव्हां याची पृष्ठ-

संख्या १६ असून वर्गणी ३ रुपये होती. पुढे कमानें पृष्ठांची संख्या

२०, २४, आणि ३२ होलन आतां तर ४० वाचकांस दर महि

न्यांत मिळण्याची सोई झाली आहे. शिवाय हल्ली ८ पुष्ठे ज्यास्त

देण्याऐवजी वर्ष अखेर स्वतंत्र पुस्तक अगर पुस्तकें देण्याची व्यवस्था

केली आहे. तथापि वर्गणीच्या रकमेत काही फेरफार केलेला नाही

इतकेच नाहीं, पण आतां बाहेरगांवच्या वर्गणीदारांसे टपाल खर्चही

माफ केला आहे. उत्तम प्रतीचे ग्रंथावलोकन, एक वर्षभर,

अवध्या तीन रुपयांत मिळते.


पुस्तक खालील पत्त्यावर मागवावें:-

म्यानेजर,--विविधज्ञानविस्तार,

फणसवाडीत अग्निहोत्र्यांच्या वाड्यासमोर, मुंबई.