पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोहा जो न वळे, ढळे न अथवा निंदास्तुतीच्या वळे, आचारास विचार मित्र ह्मणती ज्याच्या प्रयत्ने मिळे, लीलेनेच हवी तशी नटवुनी ही देशभाषा नटी लावी पंडितही तदीय भजनी जो मोठमोठे हटी; रूढींच्या दरडी असंख्य असतां मार्गात चोहींकडे धैर्ये चालविता सुधारकचमू जो वीर झाला पुढें, त्या गोपाळ गणेश आगरकरा आर्यप्रदीपासही काळें मालवुनी तमोमय अहा ! केली पुन्हा ही मही; जेणे पाहुनि गर्वभार हरिला वाक्संगरी आपला 'मालाकार' हि हार घेउनि ह्मणे हा-'वाद नाहीं भला.' नेतां गोंडवनांतुनी रघुवरा निर्वेध रामेश्वरी स्पर्धा वीर कुरंदवाडकरही ज्याच्या यशाची करी, होता कोण मुकुंदराज? ह्मणते ज्ञानेश्वरी काय ती? आहे गोड सुधारसाहुनि किती मुक्तेश्वराची कृती? विप्री नेउनियां बळे बुडवितां नाही बुडाली जळों, एक्याची अजरामरा कृति अशी होऊनि कां राहिली ? नाम्या होउनि नामदेव बसला लोकांत कोण्या गुणें ? घालावी ह्मणती जनीस कवि का साष्टांग लोटांगणे? तोंडी संतत दासबोधवचनें कां आमच्या राहती? झाला देशहितार्थ काय करिता तो जावळीचा यती? ब्रह्मानंदभरी नरां नरवरां दिंडी पताका करी घ्याया लावुनि नाचवीत असतां त्या वाळवंटावरी, श्री वैकुंठपुरी करोनि दुसरी जो दाखवी पंढरी, वाणी काय अशी अलौकिक असे त्याही तुक्याची तरी? १९ कैसी पाजुनि वामने नवरसां ही पुष्ट केली गिरा? कां तो श्रीधर पात्र होउनि बसे सर्वत्र लोकादरा ? वाग्देवीप्रति नाचवीत असतां बारामतीचा शिखी, चेतोटत्तिहि नाचतात ह्मणती कां आमच्या पारखी ? आहे वाङ्मय आपलें नवरसीं ओथंबलें हैं किती ? लोकां बोधहि काय काय करिती त्या पूर्वजांच्या कृती?आह्मां सर्वहि काव्यसंग्रहमिषे हैं जो सुधी दाखवी, गेला* वामनराव ओक विलया तोही कवींचा कवी! * वामन दाजी ओक.