पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दे तो जन्मचि तात कर्म परि हे *तात्यामुळे ज्या मिळे,
पुण्यें पूर्वकृतेंच जो सुमतिचा दाता मला आढळे,
ऐश्वर्यी न चळे, ढळे न सहसा कर्तव्यकर्मवतीं,
गेला सोडुनि नीळकंठहि* मला तो दिव्यलोकाप्रती; 

साजे पंडित पंडितांत, मिरवे वक्त्यांत वक्ता तसा,
पुण्यश्लोक जया उठोनि ह्मणते अत्यादरें 'या बसा!'
दिक्प्रांत स्वयशें भरी, निजगुणें चित्तें जनांची हरी,
स्वर्गारोहण तो अजातरिपुही †तेलंगनामा करी; 

योगाभ्यास करी न जो पद तरी योगीश्वराचें वरी,
होई वंद्य जनांहि वंद्य नव्हता जो ब्रह्मवेत्ता तरी,
सोडीना व्यसनींहि शांतनवशी शांतीस ज्याची मति,
‡मामा तोहि निघोनि जाय परमानंदप्रदेशाप्रति; 

दैवाने असतां चुकोनि खरडी घासावया लाविला
मानी बुद्धिबळेच पंडितपदा जो आपल्या पावला,
ज्याचे सायणमल्लिनाथहि सुखें होऊ पहाते सखे,
विद्वद्रत्नहि काळ तस्कर हरी ते §शंकरासारखें; 

वर्षे चार सुभाषिती सुरुचिरी 'मित्रोदयीं' त्या जसा
झाला लोकमनांस जो रमविता 'इंदुप्रकाशी' तसा,
शांतीचा पुतळा सती सुमतिचा आनंददायी मळा
৳गोविंदात्मज तो गणेशहि भला सायुज्यता पावला; 

विद्वत्तेत नसोनि पंडित जगन्नाथाहुनी जो उणा
अंगी वागवितां न लेशहि जया आला कधी मीपणा,
तोही लक्ष्मण ¶रामचंद्र करुनी संसारयात्रा पुरी
गेला सोंपुनि ‘भामिनीविलसिता' ह्या आळशाच्या करीं; 

लोकी वाढवुनी पुरातन कथाकाव्येतिहासी रती,
ज्योतिःशास्त्रविदांहि जो शिकविता झाला ग्रहांच्या गती,
शिष्यी मागितला गुरु प्रतिभवीं ज्या $मोडकासारखा
तोही काळमुखी $जनार्दन पडे विद्वजनांचा सखा; 


 * नीळकंठ महादेव मोगरे. † काशीनाथ त्रिंबक तेलंग. ‡नारायण महादेव परमानंद. यांस त्यांचे इष्टमित्र मामा ह्मणत असत. §शंकर पांडुरंग पंडित. ৳ गणेश गोविंद नाडकर्णी. ¶ लक्ष्मण रामचंद्र वैद्य. $ जनार्दन बाळाजी मोडक.