पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





   कै० जावजी दादाजी चौधरी.   ६९

________________________________________________________________

दिशा जी ब्राह्मणी वळणाची होती ती बदलली नव्हती. अस्तु. तेव्हां जावजींच्या

म्हणून प्रसिद्ध झालेल्या मतांत किंवा विचारांत कोणास कांहीं दूषणीय दिसत

असेल तर त्याबद्दल जावजींस दोष न देतां त्यांच्या विश्वास्यांस दोष द्यावा.

परंतु ज्यांत कमी जास्ती दोषभाग आहे असे जावजींचे विचार फारच थोडे सां-

पडतील.शिवाय मनुष्य हा प्रमादपात्र असल्यामुळे या विश्वास्यांची मतें चुकलीं

असतील. परंतु त्या योगानें विश्वास्यांचे नियतीचा कोणीही संशय घेणार नाहीं

अशी आमची पक्की खात्री आहे. जावजींची ह्मणून प्रसिद्ध झालेली बहुतेक मतें

उदात्त, उदार, पोक्त व व्यवहार्य अशी आहेत.

 जावजी शेटचा व्यवहार फारच चोख, निर्मळ व सात्त्विक तऱ्हेचा होता. तो

तसा होता याचें वीज त्यांना पैशाची अनावर हाव नव्हती. ज्यांच्या मानकुडीवर

पैशाची पिशाचिका बसली आहे, त्यांना मान, अपमान, अब्रू, पत, सूक्त, असूक्त

वगैरे कशाचीही पऱ्वा नसते. या पैशाचे पायीं किती मनुष्यें अमानुष होऊन

गेलीं आहेत. पण जावजी हे या पिशाचिकेच्या तडाक्यांत सांपडले नव्हते.

त्यांना जितका न्याय्य व सिध्या मार्गाने पैसा मिळेल तितका पाहिजे होता.

पण अनाचाराने मिळालेली एक कवडी देखील त्यांस नको होती. आपल्याशी

व्यवहार करणाऱ्या लोकांची सोय पहाणे हा तर जावजींचा अप्रतिम गुण होता.

त्यांच्या अंगी मारवाडीपणा नव्हता. या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव या वि० ज्ञा०

विस्तारला अनेक वेळां आला आहे व या गोष्टीचा उल्लेख जावजींचे ह्यातींतही

त्यानें आत्मवृत्तकथनादिप्रसंगीं पूर्वी अनेक वेळां केला आहे. जर जावजींचे अंगीं

मारवाडीपणा असता तर आज जीं कांहीं पुस्तकें लोकांस सुलभ झाली आहेत

तीं त्यांच्या दृष्टीस पडतीं की नाही याची आह्मांस बळकट शंका आहे. नामनि-

र्देश करून इतर उदाहरणे देणें प्रशस्त नाहीं, असें समजून हा भाग संपवितों.

 जावजींचा स्वभाव मोठा मनमिळाऊ व दयार्द्र होता. त्यांना आपली पूर्व-

स्थिति अष्टप्रहर आठवत असे असे त्यांच्या वर्तनावरून दिसतें. गरीबांची

कळकळ जावजींच्या आचरणांत पावलोपावली दृष्टीस पडते. तुकारामबोवांनीं

जीं साधूचीं लक्षणें अनेक प्रसंगी सांगितली आहेत तीं सर्व जावजींचे आचरणांत

स्पष्ट दिसत होती. आमचे दृष्टीनें तर जावजी उत्कृष्ट साधुकोटींत गणले जा

ण्यास योग्य होते.