पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




  कै० जावजी दादाजी चौधरी.  ६७

____________________________________________________________

असे कांहीं वशीकरण साधलें होतें कीं यांची त्यांची दृष्टादृष्ट झाली की त्या का-

रागिरांची लहर ताळ्यावर येई. या कीर्तिमंदिरांतील लहान मोठे कोठलेही कौ-

शल्याचें काम घेऊन त्याकडे नीट पहावें ह्मणजे आमचे ह्मणण्याची प्रतीति येईल.

जावजींची हातोटी अशी कांहीं होती की, या कारागिरांची लहर एकीकडे जाऊन

त्यांस काम करण्याची कांहीं अपूर्व हुरूप येत असे आणि याचमुळे जावजींची

कामें अपेक्षित इयत्तेच्या वर उतरत असत. आतां वशीकरणाची हातोटी जाव-

जींस साधली होती असे ह्मटल्यावर त्या हातोटीचे घटक गुण जावजींचे अंग

जागरूक होते हैं कांहीं मुद्दाम सांगणें नको. या घटकगुणांपैकी प्रधानत्वेंकरून

पांच गुण जावजींचे अंगीं विशेषच होते. उदार व असंकुचित वृत्ति, आपल्याशों

संबद्ध अशा लोकांवर पूर्ण विश्वास, दुसऱ्याच्या कामांत ढवळाढवळ करायाची

नाहीं हा बाणा, अंगीकृताचा परित्याग करायाचा नाहीं असा निश्रय, व आपल्या

लोकांवर अकृत्रिम प्रेम, हें घटकगुणपंचक जावजींचे अंगीं जातिवंत खिळलेले

होते असे दिसतें. ओढून ताणून आणलेलें चंद्रबळ किती वेळ टिकणार? गायकवाड

सरकारची बालवोधाकरितां दिलेले देणगीची गोष्ट सुप्रसिद्धच आहे. 'काव्यमाला'

हे पुस्तक व्यापारीदृष्टीनें फायद्याचा सवदा नाहीं हें खरें. पण तेवढ्याकरतां तें

पुस्तक बंद करावयाचें नाहीं असा त्यांचा निग्रह होता. संपादक ज्या दिवशीं

आपल्या जवळचा संग्रह आटपला असें ह्मणतील ते दिवशी काव्य माला बंद

करण्याचा विचार करूं असे ते ह्मणत. आणखी जावजींच्या या गुणांच्या बद्दलच्या

गोष्टी अनेक प्रसिद्ध आहेत व त्यांपैकी बऱ्याचशा रा० सा० ओकांच्या चरित्रांत

दाखल झाल्या आहेत.

 जावजी हे गुणी लोकांचे मोठे भोक्ते व चाहते असे होते. ते स्वतः गुणी

असल्यामुळे त्यांना गुणांची कदर असावी हैं अगदीं नीट आहे. त्यांना त्यांच्या

कारागिरांनी अमुक एक सामुग्री पाहिजे ह्मणून सांगितले की त्यांनी तिची

सिद्धता करून दिलीच. पैशाकडे किंवा श्रमांकडे त्यांनी कधी पाहिले नाहीं.

याचे कारण आपल्या कारागिरांवर पूर्ण विश्वास हे कारागीर आपणास गैर

असे कांही सांगायाचे नाहींत असे ते ह्मणत व त्याप्रमाणे वागत. येथें ही गोष्ट

सांगितली पाहिजे की, या कारागीर मंडळीनेंही पण जावजींशीं कधीं बेइमानी,

कुचरपणा किंवा विश्वासघात केला नाहीं. अशी नामांकित, इमानी, परार्थपरायण

कारागीर मंडळी जावजींस मिळाली हाणून त्यांच्या कीर्तीचा एवढा डोलारा उभा