पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




६६   चार चरित्रात्मक लेख.

अंगी हे दोनही गुण पण अतिशय होते. यामुळे तर यांची इतकी ख्याति व

भरभराट झाली. हा गुण एका शब्दाने सांगतां येण्याजोगा नाहीं. कारागीर लोक

– मग ते काष्टमंदिराचे, लोष्टमंदिराचे, पाषाणमंदिराचे, धातुमंदिराचे, रत्नमंदि-

राचे, विद्यामंदिराचे, कीर्तिमंदिराचे किंवा कोणत्याही प्रकारचे मंदिराचे असोत-

ते लहरी असायाचे. असा आपल्या इकडे तरी ओतप्रोत अनुभव आहे. त्यांची

लहर, तव्वेत संभाळणे ह्मणजे नाकी नऊ येतात. या कारागिरांशीं कधीं प्रसंग

न यावा अशी केव्हां केव्हां इच्छा होण्याचे प्रसंग व्यवहारांत कितीकदां तरी

येतात. परंतु व्यवहारांत तशी इच्छा धरून चालत नाहीं. तेव्हां या कारागिरांची

मनधरणी केल्यावांचून तर सत ना गत. पण त्यांना खुष व राजी राखून त्यांना

आपलेसे करून टाकणें ही हातोटी सगळ्यांना साधत नाहीं. ज्यांना साधते ते

मात्र यशस्वी होतात. या कारागिरांचे लहरींचा अनुभव ज्यांना थोडा बहुत

तरी नसेल असे फार थोडे लोक सांपडतील. जर अगदी हलके सलके कारागीर

लोक-उदाहरणार्थ शिंपी, चांभार, वगैरे- सुद्धां दहा पांच वायदे केल्याशिवाय

किंवा पांच दहा खेपा घालविल्याशिवाय एकादें लहानसें काम करून यायाचे

नाहींत तर मोठमोठे नामांकित, अवजड व कुशलतेचीं काम करणारे कारागि-

रांनी वर्षांची वर्षे लहरीच्या सबबीवर झुलकावणी दिली तर नवल काय ? श्री०

कुरुंदवाडकरांनी प्रसिद्ध गुणी व आधुनिक विश्वकर्मा भिवा सुतार यास राम-

पंचायतन, मारुती व गणपति यांच्या हस्तिदंती मूर्ति करण्याकरितां कुरुंदवाडास

दीड वर्ष नेऊन ठेविलें होतें व सदर संस्थानिक हे गुणैकपक्षपाती असल्यामुळे

त्यांनीं यथाशक्ति–संस्थानिकांच्या शक्तीचें मान लक्षांत ठेविले पाहिजे-भिवाजींची

दीड वर्ष खुषामत केली. परंतु सदर कारागिराची लहरच लागेना. पुढे जेव्हां

लहर आली तेव्हां दोन महिन्यांत तितक्या मूर्ति करून दिल्या. त्या मूर्ति इतक्या

कांहीं सुंदर, सुबक, मनोरम, व नेत्राह्लादक झाल्या आहेत की पाहणारा घटका-

भर आनंदभरांत मग्न होऊन जातो व त्याला असे वाटतें कीं भिवाला प्राणप्र-

तिष्ठेची जर कला साधली असती तर सौंदर्यादि सर्व भाव त्यानें मूर्तिमंत आह्मां

सर्वोपुढे उभे केले असते. अस्तु. तेव्हां कारागिरांची मनरधणी करून त्यांना

आपलेंसें करणें किती कठिण आहे ! त्यांतून एकाद्या कारागिराची मनधरणी

करायाची असती तर गोष्ट निराळी. जावजींच्या या कीर्तिमंदिरांत खपणारे

कारागीर निदान आजवर हजार पांचशे तरी होऊन गेले असतील. पण जावजींना